Wednesday, September 22, 2010

Inspirational Quotes - ( from 'Mrutunjay' - by Shivaji Sawant)




Mrutunjay :

Some days back I read about the book named "Mrutunjay" by Shivaji Sawant in news paper's Sunday supplement. I had read that book 2-3 years back. But in this article the reader has put couple of lines from book and I like them most. The lines were so inspiring that I thought to put them with picture. So I searched for suitable picture, I got one photo clicked by me on trek on Purandar fort last year. Hope you will like it as well.

Tuesday, June 29, 2010

हसरे दु:ख - भा.द. खेर

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेले नाव आणि चार्ली चाप्लीन चा फोटों बघून मला हे पुस्तक वाचावेसे वाटले, पुस्तकाचे नाव आणि चार्ली चाप्लीन याचा नेमकी काय संबध आहे हे जाणून घ्यावेसे वाटले. आयुष्भर ज्याने लोकांना फक्त हसवलेच त्याचे आयुष्य इतके कारुण्याने भरलेले होते यावर खरतर लवकर विश्वासच बसत नाही.
चार्ली चाप्लीन चे बालपण कसे खडतर गेले. तो आणि त्याच्या भावासाठी त्याच्या आई ने घेतलेले कष्ट, त्याचे आईवर असलेले प्रेम, नंतर त्याची आईला वेड लागल्यानंतर इस्पितळात भरती केल्यानंतर झालेली चार्ली ची मनाची झालेली ओढाताण. हे सगळे वाचल्यावर चकित व्हायला होते कि इतके दु:ख भोगून सुद्धा हा माणूस सगळ्या जगाला आपल्या सहज सुंदर अभिनयाने आयुषभर हसवतच आला.
यशाच्या शोधात तो अमेरिकेत आला आणि त्याने खूप यश कमावले. पण त्याला संसार सुखं काही लवकर भेटले नाही. तीन लग्न अपयशी झाल्यानंतर त्याचे चवथें लग्न मात्र त्याला सुखं देऊन गेले. ब्रिटन सोडून अमेरिकेत गेल्यावर त्याला खूप यश मिळाले. पण दुसऱ्या महायुद्धा नंतर त्याच्यावर कमुनिस्टचा शिक्का बसल्यानंतर त्याने अमेरिका सोडली आणि स्विझर्लंड मध्ये स्थाईक झाला. तिथेच त्याने जगाचा निरोप घेतला.
आपल्या हसऱ्या मुखवट्यातून जीवनाच्या सुक्ष्म वेदनेचा वेध घेणाऱ्या कलाकाराची मनस्वी कहाणी.
चार्ली चे त्याच्या आई वर खूप प्रेम होते. त्यामुळेच तो आई विषयी म्हणतो
" मला भेटलेल्या सर्व स्रियांपेक्षा माझी आई अधिक उजवी होती.... नंतर मी जगभर हिंडलो पण मला माझ्या आई सारखी परिपूर्ण स्री मला कुठेही भेटली नाही. मी आज जो काही आहे तो केवळ तिच्यामुळेच आहे. "

Some of his quotes are really inspiring,
"You'll never find a rainbow if you're looking down"
"Nothing is permanent in this wicked world, not even our troubles."
"I always like walking in the rain, so no one can see me crying."
"We think to much and feel to little."
"To truly laugh, you must be able to take your pain, and play with it."