Monday, April 09, 2012

काही वाचनीय लेख (8 April, 12)

काही वाचनीय लेख :-

एम्प्लॉयमेंट चौकात 'सेल्फ सर्व्हिस' (उत्तम कांबळे)
एम्प्लॉयमेंट चौकात कामासाठी मजूर मिळत नाहीत हे थोडं विचित्रच वाटत होतं. टपरीवाल्याशी बरंच बोलावं असं वाटत होतं; पण तो खूपच बिझी होता. स्टोव्ह, चहाची किटली, ग्लास याबरोबर झुंजत होता. एकटाच होता. केटी, कट, स्पेशल यांसारख्या चहाची ऑर्डर सुरूच होती. बिनसाखरेचा चहा घेऊन मी निघालो.
(संदर्भ : सकाळ ) Link : एम्प्लॉयमेंट चौकात 'सेल्फ सर्व्हिस'


शब्दारण्य :देव देव्हाऱ्यात नाही... (नीरजा )
माणसं दिवसेंदिवस अंधश्रद्धेकडे झुकू लागली आहेत. त्याचा फायदा व्यापारी मनोवृत्तीचे लोक नेमका उठवताहेत. मध्यंतरी ‘देऊळ’सारखा चित्रपट आला. माणसानं केलेल्या श्रद्धेच्या बाजारीकरणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटानं जी मंडळी विचार करत होती, तीच कदाचित अस्वस्थ झाली असावीत. पण जे या बाजाराचा भाग होऊन जगताहेत त्यांचं काय? सिद्धीविनायकासमोरच्या तरुण पिढीच्या रांगा कमी झाल्या का? लालबागच्या राजावर होणाऱ्या पैशाच्या पावसाचे प्रमाण कमी झाले का? अर्धा भारत दारिद्रय़ात जगतो आहे, शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यांना कोणतीही मदत जात नाही. पण देवस्थानासमोरच्या पैशांच्या आणि सोन्याच्या राशी मात्र वाढतच चालल्या आहेत. हे कशाचं द्योतक आहे?
(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  देव देव्हाऱ्यात नाही..

मॉल कॉम्प्लेक्स ( शफाअत खान )
‘मॉल कॉम्प्लेक्स’मुळे अनेक कुटुंबांत भयंकर अडचणी निर्माण झाल्या. मॉलमधून मॉल कॉम्प्लेक्सचे असंख्य बळी सामानाने खचाखच भरलेल्या अनेक पिशव्या घेऊन रस्त्यावर येत होते. ते आनंदाच्या भाराने वाकले होते. थकले होते. आतल्या आत जांभया देत होते. काहींना उगाचच अडचणी संपल्या असं वाटून हसू येत होतं. काहीजण आता खऱ्या अडचणी सुरू झाल्या असं समजून धास्तावून गेले होते. असो!
.. पुन्हा पुढच्या आठवडय़ात ही माणसं रांगा लावून मॉलमध्ये शिरतील. गंडाने पछाडतील. स्वत:ला गंडवून, त्रासवून घेतील.

(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  मॉल कॉम्प्लेक्स

सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार ( डॉ. गिरीश कुलकर्णी )
आज देशातील कानाकोपऱ्यात सेवाकार्याच्या ध्यासाने प्रेरित झालेले असंख्य तरुण-तरुणी लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. त्यांच्या या रचनात्मक धडपडीमागे प्रेरणेचा आणि ऊर्मीचा एक समान धागा आहे. ज्याचे नाव- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्याप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, त्यांच्या सहवासातून आणि त्यांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरांतून!
(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार






No comments: