मृत्युंजयकार शिवाजी सावंत
( जन्म : ३१ ऑगस्ट १९४० , मृत्यू : १८ सप्टेंबर २००२)
जन्मगाव : आजरा, जि. कोल्हापूर
त्यांच्या पहिल्याच 'मृत्युंजय' या कादंबरीला प्रचंड लोकप्रियता लाभली आणि त्यांना 'मृत्युंजयकार' हि उपाधी मिळाली.
'मृत्युंजय' ची कन्नड, गुजराती, मल्याळी, बंगाली, हिंदी व राजस्थानी भाषेतहि भाषांतरित झाली आहे.
आजही 'मृत्युंजय' ची लोकप्रियता कमी झालेली नाही.
प्रकाशीत साहित्य :-
१. मृत्युंजय ( महाभारतातील कर्णाच्या जीवनावरील कादंबरी, १९६७ )
२. छावा ( छत्रपती संभाजींच्या जीवनावरील कादंबरी, १९६९)
३. युगंधर (श्रीकृष्ण चरित्रावरील कादंबरी, २०००)
४. लढत ( पदमश्री विखे पाटील यांच्या जीवनावरील कादंबरी, १९८५)
५. अशी मने असे नमूने
६. मोरावळा
७. संघर्ष ( कामगारनेते भाई कोतवाल यांच्या जीवनावर )
८. शेलका साज
९ . कवडसे
"...मंदिराच्या माथ्यावर पाषाणाच्या निरुंद फटीत उगवलेलं ते पिप्पलाच रोपट बघ ! आपली लुशलुशीत लाल पान हलवून सांगत आहे कि, या पाषाणाच्या माथ्यावर पाय देवूनही मला जगायचं आहे ! वायुबरोबर डुलायाचं आहे ! प्रतिकुलतेच्या पाषाणाला एक साधसं रोपटेसुद्धा शरण जायला तयार होत नाही आणि मानव मात्र ..."
-- 'मृत्युंजय' मधून
"...जे जीवन मिळवण्याचा अधिकार नाही, ते गमावण्याचाही अधिकार नाही. आत्महत्या म्हणजे भावनाविवश मनाचा आत्म्यावर सरळ बलात्कार होय ! ... अशांनी सहनशील धरती कडे पाहावे. तिच्यासारखी असंख्य आघात सहन करण्याची शक्ती वाढवावी. शारीरिक, सांपत्तिक व लौकिक नव्हे तर आत्मिक आणि मगच योग्य वेळी अनंतात विलीन होवून जावे कारण कुणीही कधीही विसरू नये कि काळ अखंड आहे ....जीवन हि भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू राहणारा अखंड प्रवास आहे ...."

No comments:
Post a Comment