एस. एम. पंडित ( जन्म : मार्च २५, १९१६, गुलबर्गा, कर्नाटक, मृत्यू : मार्च ३०, १९९३ मुंबई, महाराष्ट्र)
ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरची त्यांची चित्रे विशेष गाजली. त्यांनी रामायण-महाभारतील दृश्य, शाकुंतल सारख्या पौराणिक कथा, रंभा, उर्वशी या विषयांवर चित्रे काढली आणि ती विशेष गाजली. राम-सीता हे त्यांचे खूप गाजलेले चित्र. विवेकानंद, इंदिरा गांधी, महात्मा गांधी यांची चित्रेही त्यांनी काढली.
त्यांची माहीती आणि चित्रे : http://smpanditji.blogspot.in/
त्याच्या विषयी माहिती ‘ महाराष्ट्रातील कलावंत आदरणीय आणि संस्मरणीय ‘ ( बाबुराव सडवेलकर, ज्योस्त्ना प्रकाशन ) या पुस्तकातही आहे.
चित्रकार रंगसम्राट रघुवीर शंकर मूळगावकर (नोव्हेंबर १४, १९१८ - मार्च ३०, १९७६)
अनेक साहित्याकांच्या ( प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी ) पुस्काची मुखपृष्ठे, नियतकालिकांची (दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण इ.)व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्यातून साकारली.
‘श्रावण सरी’ भाग - १ : रंगसम्राट मुळगावकरांच्या निमित्ताने..
व्हिन्सेंट व्हॅन गॉग ( ३० मार्च, १८५३ – २९ जुलै, १८९० )
आपल्या वेगळ्या शैलीने चित्रकलेच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात चित्रकार. जगातील सर्वोत्तम, सर्वाधिक लोकप्रिय आणि महागड्या कलाकृतींमध्ये व्हिन्सेंट च्या कलाकृतीचा समावेश होतो.
आयवर्हिंग स्टोनच्या व्हॅन गॉगवरील ‘लस्ट फॉर लाईफ’ या कादंबरीचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केला आहे.
पुस्तकाचे नाव : व्हिन्सेंट व्हान गॉग
मूळ लेखक : आयर्विंग स्टोन
अनुवादक : माधुरी पुरंदरे
प्रकाशन : पुरंदरे प्रकाशन
व्हिन्सेंट व्हॅन गॉ च्या वहिनी जोहान्ना व्हॅन गॉ यांनी लिहिलेल्या आठवणींचे मराठी हृदयांतर अनिल कुसुरकर यांनी केले आहे.
पुस्तकाचे नाव : व्हिन्सेंट व्हान गॉच्या आठवणी
मूळ लेखक : जोहान्ना गॉ (व्हिन्सेंट व्हान गॉचि वाहिनी )
अनुवादक : अनिल कुसुरकर
प्रकाशन : ग्रंथाली
स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को दे गोया (३० मार्च, १७४६- १६ एप्रिल, १८२८)
No comments:
Post a Comment