Wednesday, March 21, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 21 March

वेद मेहता : ( जन्म : २१ मार्च १९३४ - ह्यात )

एका पंजाबी डॉक्टरचा मुलगा. वयाच्या चौथ्या वर्षी आलेले आंधळेपण. पंचेंद्रियांतले एक अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे दृष्टी. तीच हरपल्यावर वेदच्या विकासाचे सारे मार्गच खुंटले. पण वेद निसर्गत: बुद्धिमान होता आणि ज्ञानाची त्याची भूक विलक्षण तीव्र होती.
पंजाबी घरात जन्मलेला वेद मुंबईमधील दादरच्या अंधशाळेत येऊन दाखल झाला. तिथे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर अनेक अमेरिकन विद्यापीठांशी संपर्क साधण्याची त्याने धडपड केली. शेवटी एका विद्यापीठाने त्याला प्रवेश दिला. आंधळा वेद आपल्या व्यंगावर मात करून जिद्दीने अमेरिकेत पोहोचला. तिथे शिकून सवरून मोठा झाला; आणि आज तो तिथला एक नामांकित वृत्तपत्रकार बनला आहे.
'आंधळ्याचे डोळे' हा वेदच्या 'फेस टु फेस' या आत्मचरित्राचा अनुवाद आहे. वेधक आणि रसाळ. कादंबरीहून चित्ताकर्षक आणि काव्याहून हृदयस्पर्शी. अदम्य आत्मविश्वास, तीव्र ज्ञानलालसा आणि अनावर जीवनासक्ती यांची ही प्रेरक आणि सुंदर गाथा आहे.

'आंधळ्याचे डोळे' - शांता शेळके - मेहता प्रकाशन ( मूळ कादंबरी : 'Face To Face' By Ved Mehta)


http://www.vedmehta.com/

No comments: