Thursday, March 29, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 30 March


वसंत आबाजी डहाके (मार्च ३० १९४२ -हयात )

मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.
जन्मगाव : बेलोरा, जि. यवतमाळ
अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन ( फेब्रुवारी २०१२, चंद्रपूर)
 http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87

कविवर्य वासुदेव गोविंद मायदेव (वा. गो. मायदेव जन्म - जन्म २६ जुलै १८९४, मृत्यू ३० मार्च १९६९)

गंभीर विचारवृत्तीच्या, बालांसाठीच्या कविता मायदेव यांनी लिहिल्या.
http://www.manogat.com/node/19576

चित्रकार ( 30 March )

एस. एम. पंडित ( जन्म : मार्च २५, १९१६, गुलबर्गा, कर्नाटक, मृत्यू : मार्च ३०, १९९३ मुंबई, महाराष्ट्र)
ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरची त्यांची चित्रे विशेष गाजली. त्यांनी रामायण-महाभारतील दृश्य, शाकुंतल सारख्या पौराणिक कथा, रंभा, उर्वशी  या विषयांवर चित्रे काढली आणि ती विशेष गाजली. राम-सीता हे त्यांचे खूप गाजलेले चित्र. विवेकानंद, इंदिरा गांधी, महात्मा गांधी यांची चित्रेही त्यांनी काढली.
त्यांची माहीती आणि चित्रे : http://smpanditji.blogspot.in/
त्याच्या विषयी माहिती ‘ महाराष्ट्रातील कलावंत आदरणीय आणि संस्मरणीय ‘ ( बाबुराव सडवेलकर, ज्योस्त्ना प्रकाशन ) या पुस्तकातही आहे.

चित्रकार रंगसम्राट रघुवीर शंकर मूळगावकर (नोव्हेंबर १४, १९१८ - मार्च ३०, १९७६)
अनेक साहित्याकांच्या ( प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी ) पुस्काची मुखपृष्ठे, नियतकालिकांची (दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण इ.)व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्यातून साकारली.
श्रावण सरीभाग - १ : रंगसम्राट मुळगावकरांच्या निमित्ताने..

व्हिन्सेंट व्हॅन गॉग ( ३० मार्च, १८५३ – २९ जुलै, १८९० )

आपल्या वेगळ्या शैलीने चित्रकलेच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात चित्रकार. जगातील सर्वोत्तम, सर्वाधिक लोकप्रिय आणि महागड्या कलाकृतींमध्ये व्हिन्सेंट च्या कलाकृतीचा समावेश होतो.

आयवर्हिंग स्टोनच्या व्हॅन गॉगवरील लस्ट फॉर लाईफया कादंबरीचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केला आहे.  
पुस्तकाचे नाव : व्हिन्सेंट व्हान गॉग
मूळ लेखक : आयर्विंग स्टोन  
अनुवादक : माधुरी पुरंदरे  
प्रकाशन : पुरंदरे प्रकाशन 

व्हिन्सेंट व्हॅन गॉ च्या वहिनी जोहान्ना व्हॅन गॉ यांनी लिहिलेल्या आठवणींचे मराठी हृदयांतर अनिल कुसुरकर यांनी केले आहे.
पुस्तकाचे नाव : व्हिन्सेंट व्हान गॉच्या आठवणी
मूळ लेखक : जोहान्ना गॉ (व्हिन्सेंट व्हान गॉचि वाहिनी )    
अनुवादक : अनिल कुसुरकर    
प्रकाशन : ग्रंथाली

स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को दे गोया (३० मार्च, १७४६-  १६ एप्रिल, १८२८)



बाल गाडगीळ (जन्म : २९ मार्च १९२६ - मृत्यू : २१ मार्च २०१०)

बाल गाडगीळ (पांडुरंग लक्ष्मण गाडगीळ, जन्म : २९ मार्च १९२६ - मृत्यू : २१ मार्च २०१०)
ज्येष्ठ विनोदी साहित्यिक, कथाकार, अनुवादकार आणि सिंबायोसिसचे माजी उपाध्यक्ष प्राचार्य.
विनोदी आणि अर्थशास्त्र विषयावरील लेखनाबद्दल प्रसिद्ध .
जन्मगाव : अणसुरे जि. रत्नागिरी
बाळ गाडगीळ यांची ३० हून अधिक विनोदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
प्रकाशित पुस्तके :-
विनोदी कथासंग्रह :-
१. ‘होशियार,
२. निगा रख्खो’,
३. ‘दुसरा चिमणराव,’
४. ‘वेडे करावे शहाणे’,
५.‘सुखी माणसाचा सदरा’,
६. ‘कुणालाही थोडक्यात पाडून देऊ’,
७. ‘हसो, हसो’,
८. ‘थ्रिल’,
९ ‘मधात तळलेले बदक’,
१०. ‘शिरसलामत’,
११. ‘फिरकी’,
१२. ‘खिल्ली’,
१३. ‘बाशिंग’,
१४.‘बंडल’,
१५. गप्पाटप्पा (पाच भाग)
१६ . ‘ लोटांगण (राज्य शासनाचा पुरस्कार)
७. ‘हसायचं नाही’,
१८. ‘जावई, मेव्हणे आणि मंडळी’
१९. ‘एकच प्याला- पण कोण?’
२०.  ‘ विनोदाचे तत्त्वज्ञान
२१. माशांचे अश्रू’
२२. ‘गबाळग्रंथ’,
२३. ‘चोर आणि मोर’,
२४. ‘उडती संतरंजी’


इतर :-
१.  वळचणीचं पाणी ( आत्मचरित्र )
२. . सिगरेट आणि वसंत ऋतू (प्रवासवर्णन )


डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ( जन्म २९ मार्च १९४८ )

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ( जन्म २९ मार्च १९४८ )
जन्मगाव :  मुखेड, जि. नांदेड
लेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध.
पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु.

कविता संग्रह :-
१.मूडस्
२. कृष्णमेघ

कादंबरी :-
१. गांधारीचे डोळे
२. मध्यरात्र
३. पराभव
४. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक संघर्ष
५. साहित्याचा अन्वयार्थ
६. साहित्य आणि समाज - प्रा. गो. मा. पवार गौरवग्रंथ
७. काळोखाचे पडघम
८. शेतकर्याचा असूड ( संपादन )

समीक्षण, वैचारीक :-
१. ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध
२. ज्योतीपर्व

कथासंग्रह :-
१. कर्फ्यू आणि इतर कथा
२. संदर्भ

Monday, March 26, 2012

भय इथले संपत नाही.... कवी ग्रेस

भय इथले संपत नाही....

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती

देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब

संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई


मर्म
 ज्याचे त्याने घ्यावेओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
…असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये
- चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस

घर थकले संन्यासी

घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते

पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्यांचे पाणी

मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई

ती गेली तेव्हा ...
 
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता
शब्दांनी हरवुनी जावे  ...
शब्दांनी हरवुनी जावे , क्षितिजांची मिट्ता ओळ,
मी सांज फुलांची वेळ, व्रुक्षांच्या कलत्या छाया

पाण्यावर चन्द्र फुलांची, मी निळीसावळी वेल.
गात्रांचे शिल्प निराळे, स्पर्शाचा तुट्ला गजरा,

मी गतजन्मीची भुल, तु बावरलेला वारा,
पायात धुळिचे लोळ, मी भातुकलिचा खेळ

त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती ॥२॥

देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब ॥४॥

संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने ॥५॥

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई ॥७॥


कवी ग्रेस (१० मे, १९३७, : २६ मार्च २०१२)

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (जन्म : १० मे, १९३७, नागपूर - निधन : २६ मार्च २०१२, पुणे)

मराठी कवितेच्या दालनात स्वयंभूपणे गेली ४५ वर्षं अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कवी.

कवी ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुस-या पिढीतील एक अग्रगण्य कवी... सन १९६७ मध्ये ' संध्याकाळच्या कविता ' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.

दुस-या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

कवितासंग्रह
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)

ललित लेखसंग्रह
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87

Saturday, March 24, 2012

व.पु. काळे ( मार्च २५, १९३२ - जून २६, २००१ )

व.पु. काळे  (वसंत पुरुषोत्तम काळेमार्च २५, इ.स. १९३२ - जून २६, इ.स. २००१)
मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.
आख्या महाराष्ट्रात व. पु. काळे माहित नाही असा रसिक शोधूनही सापडणार नाही.

"आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग.."

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत"


प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.

एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.

अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असंच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
                                                                                                                                                                                          
माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे.एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो.जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायच.
मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलायासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावतली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं कारण ज्याचं त्याच्याजवळ नसतं.भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादानं कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं आपण भावनेचा घोळ घालतो ही सगळी झापडच.
" जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
सोन्याकडून सुवासाची अपेक्षा मुळीच नाही, पण कमीतकमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत ?अपुर्णतेत मजा आहे; पण माणूस ते कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत ती अपुर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंतच. "
" रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे.मोकळेपणी रडायला धैर्य लागतं. "
"प्रियकर परिपूर्ण असतो.नवर्‍याला मर्यादा असतात" कारण संसार हा व्यवहार आहे.प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं.मीउरत नाही.म्हणून संघर्ष नसतो.संसारात तसं होत नाही."
" प्रेम म्हणजे मरण असतं.मीहा शब्द प्रेमात आणि भकतीत उरत नाही.मरणात तेच होतं.ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे,तोच खरं प्रेम करु शकतो. "
" कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत.कदाचित लावता येतीलही,पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही. "
" माणसं कृती विसरतात , पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात...
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूसराहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य.. "
वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो.काही वाणसामानाबरोबर फ़ुकट येतात.कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो.प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं,कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं,भारी Calender ही आपण पळवलेलं असतं.कितीही आकर्षक -आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ?नाविण्याइअतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल.भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकामटेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की,प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे.बुद्धी,मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे."
वपुर्वाई ब्लॉग http://vapurvai.blogspot.in/2007/10/blog-post_7498.html

Thursday, March 22, 2012

पुस्तक परिचय ( वर्तमान पत्रांमधून )

पुस्तक परिचय ( वर्तमान पत्रांमधून )

१. उमलत्या वयाची कर्करोगाशी झुंज ( नंदिनी बर्वे )

इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि अजून कॉलेज जीवनात पाऊलही न टाकलेल्या एका मुलीने- मानसी कुलकर्णीने लिहिलेले "आकाश कवेत घेताना' हे आत्मकथन.
http://www.esakal.com/esakal/20120318/5310151199346119792.htm
पुस्तकाचे नाव - आकाश कवेत घेताना
लेखिका - मानसी कुलकर्णी
प्रकाशक - शारदा प्रकाशन, ठाणे (9820176934)
पृष्ठे - 144 मूल्य : 140 रुपये.

२. वेचक कथांचा वेधक अनुवाद (डॉ. अपर्णा राईरीकर)
http://www.esakal.com/esakal/20120318/4712508527714300107.htm
पुस्तकाचे नाव - कथा गुर्जरी
अनुवाद - अंजनी नरवणे
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
(020- 24460313, 24476924. )
पृष्ठे - 298, मूल्य - 250 रुपये.

३. प्रगतिपथावरील भारताचा पासवर्ड! (डॉ. वर्षा पाध्ये)
http://www.esakal.com/esakal/20120318/5587165934337192349.htm
पुस्तकाचे नाव : Reinventing India
 लेखक : डॉ. रघुनाथ माशेलकर
प्रकाशक - सह्याद्री प्रकाशन, पुणे/ पाने 405/ मूल्य - 699 रु.

४. ‘स्व’च्या शोधातील स्त्रियांच्या कथा (मीनाक्षी दादरावाला)
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=216298:2012-03-16-18-46-04&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
पुस्तकाचे नाव : ‘दर्पणी पाहता रूप’
लेखक : विद्युल्लेखा अकलूजकर
प्रकाशक : मेहता प्रकाशन, फेब्रुवारी २०११
पृष्ठसंख्या १०२, किंमत १०० रु.

Wednesday, March 21, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 21 March

वेद मेहता : ( जन्म : २१ मार्च १९३४ - ह्यात )

एका पंजाबी डॉक्टरचा मुलगा. वयाच्या चौथ्या वर्षी आलेले आंधळेपण. पंचेंद्रियांतले एक अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे दृष्टी. तीच हरपल्यावर वेदच्या विकासाचे सारे मार्गच खुंटले. पण वेद निसर्गत: बुद्धिमान होता आणि ज्ञानाची त्याची भूक विलक्षण तीव्र होती.
पंजाबी घरात जन्मलेला वेद मुंबईमधील दादरच्या अंधशाळेत येऊन दाखल झाला. तिथे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर अनेक अमेरिकन विद्यापीठांशी संपर्क साधण्याची त्याने धडपड केली. शेवटी एका विद्यापीठाने त्याला प्रवेश दिला. आंधळा वेद आपल्या व्यंगावर मात करून जिद्दीने अमेरिकेत पोहोचला. तिथे शिकून सवरून मोठा झाला; आणि आज तो तिथला एक नामांकित वृत्तपत्रकार बनला आहे.
'आंधळ्याचे डोळे' हा वेदच्या 'फेस टु फेस' या आत्मचरित्राचा अनुवाद आहे. वेधक आणि रसाळ. कादंबरीहून चित्ताकर्षक आणि काव्याहून हृदयस्पर्शी. अदम्य आत्मविश्वास, तीव्र ज्ञानलालसा आणि अनावर जीवनासक्ती यांची ही प्रेरक आणि सुंदर गाथा आहे.

'आंधळ्याचे डोळे' - शांता शेळके - मेहता प्रकाशन ( मूळ कादंबरी : 'Face To Face' By Ved Mehta)


http://www.vedmehta.com/

Monday, March 19, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 20 March

वसंत शंकर कानेटकर  (मार्च २०, इ.स. १९२०; रहिमतपूर, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - जानेवारी ३१, इ.स. २००१)
मराठी नाटककार.
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0


- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, ठाणे, इ.स. १९८८
- सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार ( इ.स. १९६६, हिंदी चित्रपटः आँसू बन गये फूल, मूळ मराठी नाटकः अश्रूंची झाली फूले)
- पद्मश्री पुरस्कार ( इ.स. १९९२)

बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६)
मराठी कवी व लेखक.
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0

मर्ढेकरांची कविता     (कविता संग्रह  - मौज प्रकाशन ) 
रात्रीचा दिवस/तांबडी माती/पाणी     (एकत्र प्रकाशीत कादंबरी - मौज प्रकाशन )  
सौंदर्य आणि साहित्य         (मौज प्रकाशन)   
कला आणि मानव

- साहित्य अकादमी पुरस्कार ( इ.स. १९५६ - 'सौंदर्य आणि साहित्य'साठी)

मर्ढेकरांचे रेडिओपर्व ( लोकसत्ता )
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27173:2009-11-27-13-04-54&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=११७

विसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर
http://sureshshirodkar.blogspot.in/p/blog-page_3742.html

त्यांच्या काही कविता :-
http://sureshshirodkar.blogspot.in/search/label/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0

http://sureshshirodkar.blogspot.in/search/label/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%०

Saturday, March 17, 2012

चित्रकार विश्वनाथ नागेशकर


चित्रकार  विश्वनाथ नागेशकर (जन्म : १८ एप्रिल १९१० - निधन : १८ मार्च २००१ ( जर्मनी मध्ये ) )

गोमंतक भूमीचे जग प्रसिद्ध चित्रकार
भारत सोडून जर्मनीत स्थायिक होणारे नागेशकर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताच्या कलाक्षेत्रातील खरे धाडसी चित्रकार.
फोंडा, गोवा नजीकच्या नागेशी या निसर्गरम्य व श्री नागेशाचे वरदहस्त लाभलेल्या गावात बालपण.
त्यांच्या चित्रांमधून भारतीय आणि पाश्चीमात्य चित्र परंपरेचा सुरेख संगम दिसून येतो.

आपल्या मातृभूमीशी, परिवाराशी जीवनभर नाते जपणाऱ्या या जगविख्यात चित्रकाराचे जीवन, कार्य, कर्तृत्व यावर 'विश्वरंग ' हे पुस्तक आधारित आहे.
http://www.muktapublishing.com/vishwarang

http://www.nageshkarart.com/index.html