Saturday, April 14, 2012

One day trip (Tulapur and Phulgaon)


Tulapur, about 40 km from Pune, Pune-Nagar road .Reaching to Tulapur was not much difficult as one has to drive towards nagar, after Wagholi, Lonikand you will get Phulgaon subway. After taking turn one abot 15 mins of drive after Phulgaon you will reach to Tulapur. It is situated at a place where three rivers. Bheema Bhama and Indrayani meet.
Tualpur and Phulgaon are the good places to visit in a day, which are having historical background and are blessed with nature beauty.

A brief about history :

Tulapur mainly known for load shiva temple called ‘Sangmeshwar’ and shrine of Shri Sambhaji Maharaj, the son of Great Shivaji Maharaj.
Tulapur originally known as ‘Nagargaon’ . The Murarpant Jagdev, the one of the important name in the Adilshah’s court. Once he had developed white rashes one his face and limbs. So he went to Nagargaon to meet a sage  Swami Rudranath Maharaj. Under the treatment of Rudranath Maharaj, Murarpant got cured. Murarpant  offer some ‘Dakshina’ to Rudranath Maharaj in form of gold, silver and grains. But Rudranath Maharaj told him to donate this in poor people and also rebuild the shri Sangameshwar temple.
Murarpath immediately followed his order. He donated gold, silver, grains etc. almost 24 items among the poor with the tula of himself (each item worth weight of Murarpant) . Even he donated the gold ‘tula’ of about elephant’s weight. (gold worth weight of elephant) As tula was done on that day Nagargaon to be known as ‘Tulapur’
‘Tula’ in Sanskrit means to weigh and ‘Pur’ means a town.


Shri Chhatrapati Sambhaji Maharaj
Sambhaji Maharaj was brutally murdered at Tulapur by Aurangzeb.
Sambhaji’s was tortured to change his religion but Sambhaji raje refused.  failing to which he was killed in a brutal way. His eyes were burned off with hot iron rods and tongue was plucked. Skin was peeled off and body parts were cut. Kavi Kailash was also put to death with Sambhaji raje on 11th March 1689. The Samadhi of Sambhaji raje is situated here.

You will see following  places at Tulapur


 
1. A beautiful temple of Lord Shiva ( Sangmeshwar )








2. Samadhi of Sambhaji Raje 






3. The beautiful sangam of tree rivers ( Bheema, 
 Bhama & Indrayani). Boating facility is also there.



For more information visit: www.Tulapur.com



Phulgaon :
Phulgaon is also very nice place visit along with Tulapur.
It is situated on bank of river Bhima. It is beautiful place where you will see Kamani Ghat, it is very nice. Bajirao Peshave used to come here. There is south face (‘Dakshinmukhi’) Shani mandir.

Phulgaon has Shrutisagar Ashram, established in 1989 by Swami Swaroopanand Saraswati. It has a unique temple of Dakshinamurthy. Here one can find detailed explanations of śruti and smrti (including the Vedas, Bhagwat Gita, Upanishads and Puranas) in Marathi and English.
For more information visit : http://www.shrutisagarashram.org/
Phulgaon is also famous for education, it has a oldest school in India, started by Dhotre family in 1860.

Wednesday, April 11, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 12 April

वासुदेव गोविंद आपटे (एप्रिल १२, १८७१; - फेब्रुवारी २, १९३०)
मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार
जन्मगाव  : धरणगाव, खानदेश, महाराष्ट्र

Wikipedia Link वासुदेव गोविंद आपटे

पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० - ऑगस्ट १३, १९८०)
मराठी लेखक.
 १७ कादंबऱ्या, २६ कथासंग्रह, ८ नाटके, १२ लेखसंग्रह, २ पटकथा इतके  लेखन त्यांनी केले.
 अध्यक्ष,  ( मराठी साहित्य संमेलन, पुणे, १९७७)

Wikipedia Link पुरुषोत्तम भास्कर भावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम येथील लेख

Monday, April 09, 2012

श्रीधर व्यंकटेश केतकर : (२ फेब्रुवारी १८८४ – १० एप्रिल १९३७)

श्रीधर व्यंकटेश केतकर : (२ फेब्रुवारी १८८४ – १० एप्रिल १९३७). महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे निर्माते, समाजशास्त्रज्ञ, इतिहासज्ञ, कादंबरीकार व विचारवंत.
जन्मगाव : रायपुर, मध्यप्रदेश
अध्यक्ष ( महाराष्ट्र साहित्य संमेलन १९३१ )

 Link : मराठी विश्वकोश : केतकर, श्रीधर व्यंकटेश
 
महाराष्ट्र टाईम्स लेख  :  ज्ञानकोशकार श्रीधर केतकर 

लोकसत्ता लेख  : ‘ज्ञानकोशा’चा वारसा विसरू नका...

 

काही वाचनीय लेख (8 April, 12)

काही वाचनीय लेख :-

एम्प्लॉयमेंट चौकात 'सेल्फ सर्व्हिस' (उत्तम कांबळे)
एम्प्लॉयमेंट चौकात कामासाठी मजूर मिळत नाहीत हे थोडं विचित्रच वाटत होतं. टपरीवाल्याशी बरंच बोलावं असं वाटत होतं; पण तो खूपच बिझी होता. स्टोव्ह, चहाची किटली, ग्लास याबरोबर झुंजत होता. एकटाच होता. केटी, कट, स्पेशल यांसारख्या चहाची ऑर्डर सुरूच होती. बिनसाखरेचा चहा घेऊन मी निघालो.
(संदर्भ : सकाळ ) Link : एम्प्लॉयमेंट चौकात 'सेल्फ सर्व्हिस'


शब्दारण्य :देव देव्हाऱ्यात नाही... (नीरजा )
माणसं दिवसेंदिवस अंधश्रद्धेकडे झुकू लागली आहेत. त्याचा फायदा व्यापारी मनोवृत्तीचे लोक नेमका उठवताहेत. मध्यंतरी ‘देऊळ’सारखा चित्रपट आला. माणसानं केलेल्या श्रद्धेच्या बाजारीकरणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटानं जी मंडळी विचार करत होती, तीच कदाचित अस्वस्थ झाली असावीत. पण जे या बाजाराचा भाग होऊन जगताहेत त्यांचं काय? सिद्धीविनायकासमोरच्या तरुण पिढीच्या रांगा कमी झाल्या का? लालबागच्या राजावर होणाऱ्या पैशाच्या पावसाचे प्रमाण कमी झाले का? अर्धा भारत दारिद्रय़ात जगतो आहे, शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यांना कोणतीही मदत जात नाही. पण देवस्थानासमोरच्या पैशांच्या आणि सोन्याच्या राशी मात्र वाढतच चालल्या आहेत. हे कशाचं द्योतक आहे?
(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  देव देव्हाऱ्यात नाही..

मॉल कॉम्प्लेक्स ( शफाअत खान )
‘मॉल कॉम्प्लेक्स’मुळे अनेक कुटुंबांत भयंकर अडचणी निर्माण झाल्या. मॉलमधून मॉल कॉम्प्लेक्सचे असंख्य बळी सामानाने खचाखच भरलेल्या अनेक पिशव्या घेऊन रस्त्यावर येत होते. ते आनंदाच्या भाराने वाकले होते. थकले होते. आतल्या आत जांभया देत होते. काहींना उगाचच अडचणी संपल्या असं वाटून हसू येत होतं. काहीजण आता खऱ्या अडचणी सुरू झाल्या असं समजून धास्तावून गेले होते. असो!
.. पुन्हा पुढच्या आठवडय़ात ही माणसं रांगा लावून मॉलमध्ये शिरतील. गंडाने पछाडतील. स्वत:ला गंडवून, त्रासवून घेतील.

(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  मॉल कॉम्प्लेक्स

सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार ( डॉ. गिरीश कुलकर्णी )
आज देशातील कानाकोपऱ्यात सेवाकार्याच्या ध्यासाने प्रेरित झालेले असंख्य तरुण-तरुणी लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. त्यांच्या या रचनात्मक धडपडीमागे प्रेरणेचा आणि ऊर्मीचा एक समान धागा आहे. ज्याचे नाव- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्याप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, त्यांच्या सहवासातून आणि त्यांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरांतून!
(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार






Sunday, April 08, 2012

शंकरराव खरात (जुलै ११, १९२१ - एप्रिल ९, २००१)

शंकरराव खरात (जुलै ११, १९२१ - एप्रिल ९, २००१)
जन्म गाव: आटपाडी, जि. सांगली.
मराठी लेखक, कादंबरीकार .
मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरूही.

http://mr.wikipedia.org/wiki/शंकरराव_खरात

 http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=310&Itemid=93

 वेशीबाहेरचा कुलगुरू - शंकरराव खरात  (महाराष्ट्र टाइम्स )



Monday, April 02, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 3 April

द्वारकानाथ माधव पितळे ऊर्फ नाथमाधव (एप्रिल ३, १८८२ - जून २१, १९२८)
मराठी लेखक.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्या काही मोजक्या साहित्यिकांनी आपल्या लेखणीचे एक वेगळेच दर्शन वाचकांना घडवले त्यापैकी एक म्हणजे नाथमाधव.

ऐतिहासिक विषयांवरील त्यांच्या कादंबर्या विशेष गाजल्या.

Sunday, April 01, 2012

पुस्तक परिचय ( ०१ एप्रिल, २०१२)

कर्करोगाशी दिलेल्या यशस्वी झुंजीची कथा
कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन त्यावर मात केलेल्या डॉ. गीता वडनप यांच्या पुस्तकाचा परिचय.
पुस्तकाचे नाव "लढले मी अन्‌ जिंकले मी...ब्लडकॅन्सरशी दिलेली झुंज'
लेखिका - डॉ.गीता वडनप,
प्रकाशक - राजहंस पकाशन,
मूल्य -130 रुपये

मधू मंगेश यांच्या साहित्याचा चिकित्सक वेध 
पुस्तकाचे नाव - मधू मंगेश कर्णिक  व्यक्तिमत्त्व आणि वाङ्‌मयीन कर्तृत्व
लेखक - डॉ. महेश खरात
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन
मूल्य - 280 रुपये.

सुरक्षेच्या प्रश्‍नाचे अंतरंग 
पुस्तकाचे नाव - अंडरस्टॅंडिंग नॅशनल सिक्‍युरिटी
लेखक - सिद्धार्थ जोशी
प्रकाशक - फ्लायवेल पब्लिकेशन्स
मूल्य - 495 रुपये

तीनही पुस्तकाचा परिचय
http://www.esakal.com/esakal/20120401/5119990003369682560.htm
(संदर्भ : सकाळ )

टॅपेस्ट्रीच्या अंतरंगात

मूळचे कोकणातले असलेले, पण आता जपानमध्ये स्थायिक झालेले जागतिक ख्यातीचे टॅपेस्ट्री चित्रकार प्रभाकर नाईक साटम यांचं भन्नाट आत्मचरित्र.
maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12482969.cms
पुस्तकाचे नाव - झल्लाळ
लेखक - प्रभाकर नाईक साटम
प्रकाशक - अनुभव अक्षरधन
मूल्य -
(संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स   )


लष्करी हुकुमशाहीशी अहिंसेच्या मार्गाने लढा देणाऱ्या स्त्री चि कहाणी
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=377&Itemid=378
पुस्तकाचे नाव - राजबंदिनी ( आँग सान स्यू ची हिचं चरित्र )
लेखिका- प्रभा नवांगुळ
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
मूल्य : २५० रुपये.
(संदर्भ : लोकसत्ता)


तुकड्या तुकड्यात विखुरलेलं आजचं वास्तव
नाटककार जयंत पवार यांचा पहिला कथासंग्रह.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12482949.cms
पुस्तकाचे नाव - फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
लेखिक - जयंत पवार
प्रका
शक - लोकवाङ्मय गृह
मूल्य : २०० रुपये.
(संदर्भ : लोकसत्ता)

वास्तवाचा अचूक वापर
 ' अस्तित्वाचे धागे' ही प्रा. प्रकाश खरात यांची आत्मपर कादंबरी.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12482924.cms
पुस्तकाचे नाव - अस्तित्वाचे धागे'
लेखक - प्रकाश खरात
प्रकाशक - मैत्रेय प्रकाशन
मूल्य : १५० रुपये
(संदर्भ : लोकसत्ता)

पुस्तक परिचय ( ०१ एप्रिल, २०१२)




Thursday, March 29, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 30 March


वसंत आबाजी डहाके (मार्च ३० १९४२ -हयात )

मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.
जन्मगाव : बेलोरा, जि. यवतमाळ
अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन ( फेब्रुवारी २०१२, चंद्रपूर)
 http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87

कविवर्य वासुदेव गोविंद मायदेव (वा. गो. मायदेव जन्म - जन्म २६ जुलै १८९४, मृत्यू ३० मार्च १९६९)

गंभीर विचारवृत्तीच्या, बालांसाठीच्या कविता मायदेव यांनी लिहिल्या.
http://www.manogat.com/node/19576

चित्रकार ( 30 March )

एस. एम. पंडित ( जन्म : मार्च २५, १९१६, गुलबर्गा, कर्नाटक, मृत्यू : मार्च ३०, १९९३ मुंबई, महाराष्ट्र)
ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरची त्यांची चित्रे विशेष गाजली. त्यांनी रामायण-महाभारतील दृश्य, शाकुंतल सारख्या पौराणिक कथा, रंभा, उर्वशी  या विषयांवर चित्रे काढली आणि ती विशेष गाजली. राम-सीता हे त्यांचे खूप गाजलेले चित्र. विवेकानंद, इंदिरा गांधी, महात्मा गांधी यांची चित्रेही त्यांनी काढली.
त्यांची माहीती आणि चित्रे : http://smpanditji.blogspot.in/
त्याच्या विषयी माहिती ‘ महाराष्ट्रातील कलावंत आदरणीय आणि संस्मरणीय ‘ ( बाबुराव सडवेलकर, ज्योस्त्ना प्रकाशन ) या पुस्तकातही आहे.

चित्रकार रंगसम्राट रघुवीर शंकर मूळगावकर (नोव्हेंबर १४, १९१८ - मार्च ३०, १९७६)
अनेक साहित्याकांच्या ( प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी ) पुस्काची मुखपृष्ठे, नियतकालिकांची (दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण इ.)व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्यातून साकारली.
श्रावण सरीभाग - १ : रंगसम्राट मुळगावकरांच्या निमित्ताने..

व्हिन्सेंट व्हॅन गॉग ( ३० मार्च, १८५३ – २९ जुलै, १८९० )

आपल्या वेगळ्या शैलीने चित्रकलेच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात चित्रकार. जगातील सर्वोत्तम, सर्वाधिक लोकप्रिय आणि महागड्या कलाकृतींमध्ये व्हिन्सेंट च्या कलाकृतीचा समावेश होतो.

आयवर्हिंग स्टोनच्या व्हॅन गॉगवरील लस्ट फॉर लाईफया कादंबरीचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केला आहे.  
पुस्तकाचे नाव : व्हिन्सेंट व्हान गॉग
मूळ लेखक : आयर्विंग स्टोन  
अनुवादक : माधुरी पुरंदरे  
प्रकाशन : पुरंदरे प्रकाशन 

व्हिन्सेंट व्हॅन गॉ च्या वहिनी जोहान्ना व्हॅन गॉ यांनी लिहिलेल्या आठवणींचे मराठी हृदयांतर अनिल कुसुरकर यांनी केले आहे.
पुस्तकाचे नाव : व्हिन्सेंट व्हान गॉच्या आठवणी
मूळ लेखक : जोहान्ना गॉ (व्हिन्सेंट व्हान गॉचि वाहिनी )    
अनुवादक : अनिल कुसुरकर    
प्रकाशन : ग्रंथाली

स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को दे गोया (३० मार्च, १७४६-  १६ एप्रिल, १८२८)



बाल गाडगीळ (जन्म : २९ मार्च १९२६ - मृत्यू : २१ मार्च २०१०)

बाल गाडगीळ (पांडुरंग लक्ष्मण गाडगीळ, जन्म : २९ मार्च १९२६ - मृत्यू : २१ मार्च २०१०)
ज्येष्ठ विनोदी साहित्यिक, कथाकार, अनुवादकार आणि सिंबायोसिसचे माजी उपाध्यक्ष प्राचार्य.
विनोदी आणि अर्थशास्त्र विषयावरील लेखनाबद्दल प्रसिद्ध .
जन्मगाव : अणसुरे जि. रत्नागिरी
बाळ गाडगीळ यांची ३० हून अधिक विनोदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
प्रकाशित पुस्तके :-
विनोदी कथासंग्रह :-
१. ‘होशियार,
२. निगा रख्खो’,
३. ‘दुसरा चिमणराव,’
४. ‘वेडे करावे शहाणे’,
५.‘सुखी माणसाचा सदरा’,
६. ‘कुणालाही थोडक्यात पाडून देऊ’,
७. ‘हसो, हसो’,
८. ‘थ्रिल’,
९ ‘मधात तळलेले बदक’,
१०. ‘शिरसलामत’,
११. ‘फिरकी’,
१२. ‘खिल्ली’,
१३. ‘बाशिंग’,
१४.‘बंडल’,
१५. गप्पाटप्पा (पाच भाग)
१६ . ‘ लोटांगण (राज्य शासनाचा पुरस्कार)
७. ‘हसायचं नाही’,
१८. ‘जावई, मेव्हणे आणि मंडळी’
१९. ‘एकच प्याला- पण कोण?’
२०.  ‘ विनोदाचे तत्त्वज्ञान
२१. माशांचे अश्रू’
२२. ‘गबाळग्रंथ’,
२३. ‘चोर आणि मोर’,
२४. ‘उडती संतरंजी’


इतर :-
१.  वळचणीचं पाणी ( आत्मचरित्र )
२. . सिगरेट आणि वसंत ऋतू (प्रवासवर्णन )


डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ( जन्म २९ मार्च १९४८ )

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ( जन्म २९ मार्च १९४८ )
जन्मगाव :  मुखेड, जि. नांदेड
लेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध.
पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु.

कविता संग्रह :-
१.मूडस्
२. कृष्णमेघ

कादंबरी :-
१. गांधारीचे डोळे
२. मध्यरात्र
३. पराभव
४. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक संघर्ष
५. साहित्याचा अन्वयार्थ
६. साहित्य आणि समाज - प्रा. गो. मा. पवार गौरवग्रंथ
७. काळोखाचे पडघम
८. शेतकर्याचा असूड ( संपादन )

समीक्षण, वैचारीक :-
१. ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध
२. ज्योतीपर्व

कथासंग्रह :-
१. कर्फ्यू आणि इतर कथा
२. संदर्भ

Monday, March 26, 2012

भय इथले संपत नाही.... कवी ग्रेस

भय इथले संपत नाही....

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती

देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब

संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई


मर्म
 ज्याचे त्याने घ्यावेओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
…असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये
- चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस

घर थकले संन्यासी

घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते

पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्यांचे पाणी

मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई

ती गेली तेव्हा ...
 
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता
शब्दांनी हरवुनी जावे  ...
शब्दांनी हरवुनी जावे , क्षितिजांची मिट्ता ओळ,
मी सांज फुलांची वेळ, व्रुक्षांच्या कलत्या छाया

पाण्यावर चन्द्र फुलांची, मी निळीसावळी वेल.
गात्रांचे शिल्प निराळे, स्पर्शाचा तुट्ला गजरा,

मी गतजन्मीची भुल, तु बावरलेला वारा,
पायात धुळिचे लोळ, मी भातुकलिचा खेळ

त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती ॥२॥

देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब ॥४॥

संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने ॥५॥

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई ॥७॥


कवी ग्रेस (१० मे, १९३७, : २६ मार्च २०१२)

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (जन्म : १० मे, १९३७, नागपूर - निधन : २६ मार्च २०१२, पुणे)

मराठी कवितेच्या दालनात स्वयंभूपणे गेली ४५ वर्षं अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कवी.

कवी ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुस-या पिढीतील एक अग्रगण्य कवी... सन १९६७ मध्ये ' संध्याकाळच्या कविता ' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.

दुस-या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

कवितासंग्रह
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)

ललित लेखसंग्रह
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87

Saturday, March 24, 2012

व.पु. काळे ( मार्च २५, १९३२ - जून २६, २००१ )

व.पु. काळे  (वसंत पुरुषोत्तम काळेमार्च २५, इ.स. १९३२ - जून २६, इ.स. २००१)
मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.
आख्या महाराष्ट्रात व. पु. काळे माहित नाही असा रसिक शोधूनही सापडणार नाही.

"आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग.."

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत"


प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.

एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.

अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असंच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
                                                                                                                                                                                          
माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे.एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो.जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायच.
मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलायासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावतली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं कारण ज्याचं त्याच्याजवळ नसतं.भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादानं कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं आपण भावनेचा घोळ घालतो ही सगळी झापडच.
" जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
सोन्याकडून सुवासाची अपेक्षा मुळीच नाही, पण कमीतकमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत ?अपुर्णतेत मजा आहे; पण माणूस ते कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत ती अपुर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंतच. "
" रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे.मोकळेपणी रडायला धैर्य लागतं. "
"प्रियकर परिपूर्ण असतो.नवर्‍याला मर्यादा असतात" कारण संसार हा व्यवहार आहे.प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं.मीउरत नाही.म्हणून संघर्ष नसतो.संसारात तसं होत नाही."
" प्रेम म्हणजे मरण असतं.मीहा शब्द प्रेमात आणि भकतीत उरत नाही.मरणात तेच होतं.ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे,तोच खरं प्रेम करु शकतो. "
" कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत.कदाचित लावता येतीलही,पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही. "
" माणसं कृती विसरतात , पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात...
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूसराहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य.. "
वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो.काही वाणसामानाबरोबर फ़ुकट येतात.कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो.प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं,कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं,भारी Calender ही आपण पळवलेलं असतं.कितीही आकर्षक -आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ?नाविण्याइअतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल.भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकामटेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की,प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे.बुद्धी,मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे."
वपुर्वाई ब्लॉग http://vapurvai.blogspot.in/2007/10/blog-post_7498.html